BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र



भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन प्राचार्य डॉ.सुरेश रे यांनी केले होते. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत घ्यायची काळजी, प्रसूती काळजीची कला, जन्मानंतर आई आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, मुलाच्या भविष्याची काळजी यांसह जीबी सिंड्रोमचे व्यापक व्यवस्थापन यामध्ये निदानापासून पुनर्वसनापर्यंत माहिती दिली.

बालरोग नर्सिंगमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता यामध्ये असणारी आव्हाने आणि संधींमध्ये नेव्हिगेटिंगद्वारे काळजी घेणे,दाई मानसिक आरोग्य आव्हानांना समजून घेणे, मिडवाइफरी प्रॅक्टिसमध्ये शारीरिक लवचिकता निर्माण करणे, मानसिक आरोग्य प्रथमोपचाराद्वारे बदल घडवून आणणे आदी सविस्तर चर्चा झाली.


यामध्ये डॉ. ज्योत्स्ना बुधगावकर, डॉ.ज्योत्स्ना देशपांडे, डॉ. सुधा रेड्डी, डॉ. स्नेहा पित्रे, डॉ. श्रीप्रिया गोपालक्रिष्णन, डॉ. जेसल शेठ,  डॉ. पांचाली पाल, डॉ. मनोमनी वेंकट, डॉ. सुजाता सावंत, डॉ. राधाकृष्णन जी. यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. बसवंत धुडुम, डॉ.सुनिल कुलकर्णी, डॉ.अपर्णा काळे, डॉ.विजया कुंभार, डॉ.बाहुबली गुड्डूगोळ यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा.योगेश भोसले यांनी मानले.