भारती हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाची तीन झडप आणि बायपास शस्त्रक्रिया एकाचवेळी - सीव्हीटीएस सर्जन डॉ.रणजितसिंह जाधव व टीमची कामगिरी
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकाच रुग्णाची तीन झडपांची व एक बायपास अशा चार गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजितसिंह जाधव यांनी ६६ वर्षीय रुग्णावर ही शस्त्रक्रिया ६ तासात केली.
डॉ.जाधव म्हणाले, यामध्ये दोन झडपा बदलल्या आणि एका झडपेला रिंगद्वारे व्यवस्थित करण्यात आले. रक्तवाहिनीतील अडथळ्यांना बायपासद्वारे नवीन मार्ग करण्यात आला. ही एक दुर्मिळ शस्त्रक्रिया होती. डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट विथ ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह रिपेअर हे शस्त्रक्रियेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, संबंधित रुग्णाला अत्याधुनिक असणाऱ्या या भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता हार्ट फेल्युरचे लक्षण रुग्णाला दिसत होते. जसे की ऑक्सिजनची कमतरता, दोन्ही फुप्फुसात पाणी भरणे, किडनी व लिव्हरचे रिपोर्ट वाढणे. रुग्णाची हृदय क्षमता ३५ टक्के होती.
सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजितसिंह जाधव यांनी स्टॅबिलिझेशनसाठी रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेतले. दोन दिवसात रुग्णाला स्टेबल करण्यात आले. शस्त्रक्रियेची सर्व तयारी करण्यात आली. यशस्वी शस्त्रक्रियादेखील झाली.
बऱ्याच हॉस्पिटलने या रुग्णावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ केली. कारण ती जोखीम फार मोठी होती. भारती हॉस्पिटलने ती जबाबदारी स्विकारली. असे अनेक रुग्ण आहेत जे बाहेर उपचार मिळाले नाहीत म्हणून भारती रुग्णालयात उपचार घ्यायला येतात. येथील तज्ञ डॉक्टरही त्याच तडफेने उपचार करतात. रुग्ण तंदुरुस्त होतो. अशा अनेकांचे आशिर्वाद या रुग्णालयाला लागले आहेत.
--- डॉ.रणजितसिंह जाधव (सीव्हीटीएस सर्जन )
डॉक्टरांनी माझ्यासारख्या ज्येष्ठ रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. मी त्यांचे आभार मानतो. नातेवाईकांनीसुद्धा डॉक्टर व प्रशासनाचे कौतुक केले. सर्व डॉक्टरांनी असेच गोरगरिबांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
---रुग्णाचे नातेवाईक
ती झाल्यानंतर संबंधित रुग्णाची किडनी, हृदय, लिव्हर यांचेही काम सुधारले. रुग्णाला दोन दिवस व्हेंटिलेटर आणि आयएबीपी सपोर्टवर ठेवण्यात आले. भारती रुग्णालयातील पोस्ट ऑपरेट टीमने आपले सर्व प्रयत्न पणाला लावून रुग्णाला यशस्वी बाहेर काढले. विशेष बाब म्हणजे महात्मा फुले योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून शस्त्रक्रियेसाठी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यासाठी डीन डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी यांनी मार्गदर्शन केले.
परफ्युजनिस्ट आशिष सर्वगोडे,फिजिओथेरपीस्ट डॉ.नम्रता पवार, डॉ. नेहा टोणपे, डॉ. तृप्ती मेहता, सीव्हीटीएस इन्चार्ज रोहिणी माने, श्वेता पांढरे यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ.सम्राट मदनाईक, आयसीयु टीम, नर्सेस, डाएटीक्स, अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. रूग्णाला आता घरी सोडले असून तो ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.