भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या शिबीरात ५५ मुलांना लाभ
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी यांच्या न्यूरो फिजिओथेरपी विभागातर्फे विशेष गरजा असलेल्या मुलांचे तपासणी आणि उपचार या विषयावर आधारित मोफत बाल फिजिओथेरपी शिबिर संपन्न झाले. आयोजन वडकमकारा थॉमस चाको मेमोरियल ट्रस्टच्या वडकेत डेव्हलपमेंट सेंटर, मिरज यांच्या सहकार्याने करण्यात आले. वडकेत विकास केंद्र, तानंग येथे सुमारे ५५ विशेष गरजा असलेल्या मुलांना याचा लाभ झाला.
भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्नेहा कटके म्हणाल्या, या शिबिराचा उद्देश विशेष गरजा असलेल्या मुलांचे सर्वांगीण परीक्षण करून त्यांना आवश्यक फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देणे हा होता. प्राध्यापक डॉ. मनाल अंथिकट, डॉ. ऐश्वर्या बुलबुले, डॉ. प्राची भानुशाली, डॉ. केविन मकसरे, तसेच इंटर्न्स आणि अंतिम वर्षातील विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
श्रीमती आयरीन जॉर्ज, भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदिराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे यांचे सहकार्य लाभले.