माननिय मानद संचालक यांच्या लेखणीतून
आपल्या सर्वांचे "भारती हॉस्पिटल न्यूज" च्या व्यासपीठावर मन:पूर्वक स्वागत..!
वैद्यकीय क्षेत्रामध्ये भारती हॉस्पिटल च्या माध्यमातून अत्यंत दर्जेदार सेवा देण्याच कार्य अविरत सुरू असून त्या माध्यमातून समाजातील सर्वच स्तरातील रुग्णांना त्याचा लाभ होत आहे.
भारती हॉस्पिटल च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन माहिती, चालू घडामोडी समाजापर्यंत पोहोचाव्यात व अधिकाधिक रुग्णांना त्याचा लाभ व्हावा या हेतूने जगभरात पोहोचणाऱ्या "भारती हॉस्पिटल न्यूज" या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये डिजीटल माध्यमांवर आपले नाते वृद्धिंगत होण्यासाठी सुरु केलेले हे व्यासपीठ निश्चितच आदर्शवत ठरेल व वैद्यकीय क्षेत्रात माहितीचा मुक्त स्त्रोत जगभरात पोहचविण्यात खारीचा वाटा नक्की उचलेल ही खात्री आहे.
धन्यवाद..!
- डॉ. एच. एम. कदम