डॉक्टर व पोलीस २४ तास समाजासाठी काम करतात - पोलीस अधीक्षक संदीप घुगे | भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात राज्यस्तरीय परिषद संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
रुग्णावर २४ तास लक्ष ठेवणारे जसे डॉक्टर असतात त्याचपद्धतीने समाजावर, नागरिकांंवर २४ तास बारीक लक्ष ठेवणारे पोलीस असतात त्यामुळे डॉक्टर व पोलीस २४ तास समाजासाठी राबत असल्याचे मत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केले.
येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महारेस्पि कॉन्कलेव्ह २०२५ या राज्यस्तरीय परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भारती विद्यापीठ बालरोग विभाग व इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक सांगली जिल्हा व शहर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद संपन्न झाली.
पोलीस अधीक्षक घुगे यांच्याहस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. उपस्थित सर्व बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. बालरोगातील आजार त्यांचे निदान व अद्ययावत ज्ञान या उपचार पध्दतीचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यास सांगितले.
या राज्यस्तरीय परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून २३० बालरोग तज्ञांनी सहभाग नोंदविला. सांगलीत प्रथमच हायब्रीड पद्धतीची परिषद आयोजित करण्यात आली. ज्यामध्ये ऑनलाईन ४०० बालरोग तज्ञ यांनी सहभागी दर्शवली. एकूण ६३० बालरोग तज्ञ सहभागी झाले होते.
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, परिषदेचे ऑर्गनायझिंग चेअरपर्सन व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, बालरोग विभाग प्रमुख व इंडियन अकॅडमी सांगली जिल्हा शाखेचे डॉ. सुहास कुंभार, डॉ. शरद घाडगे-आयपी सांगली सिटी ब्रांच, डॉ.अमोल पवार-सेक्रेटरी जनरल महा आयपी यांसह मिरजचे जेष्ठ बालरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास, रेस्पिरेटरी चॅप्टरचे राज्यस्तरीय अध्यक्ष डॉ. जयंत जोशी एमएमसीचे निरीक्षक डॉ. विश्राम लोमटे उपस्थित होते.
या परिषदेमध्ये प्रामुख्याने दोन वर्कशॉप झाले. पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे पेपर व पोस्टर प्रेझेंटेशन, संपूर्ण दोन दिवस लेक्चर, सिम्पोझियाम व पॅनल डिस्कशन अशा तीन प्रकारे चर्चा करण्यात आली. स्वागत डॉ. सारा धनवडे तर आभार डॉ. सुहास कुंभार यांनी मानले.