भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता.सुमारे २५० माजी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
येथील माळी थिएटर आणि गार्डन गुलमोहर कॉलनीत हा मेळावा संपन्न झाला. कॉलेज ऑफ नर्सिंग सांगली आणि अस्तित्व अल्युमिनिया यांनी आयोजन केले होते. अस्तित्व अल्युमिनिया कमिटीचे प्रेसिडेंट आणि नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी स्वागत केले. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धगिरी कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूरच्या प्राचार्या रेगिना सातवेकर होत्या. अध्यक्षस्थानी मानवसधन विकास संस्था ग्रुप हेल्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सिंधुदुर्गचे प्राचार्य ओमकार अरुण गरड होते.
सातवेकर म्हणाल्या, मला मार्गदर्शन करायला असणाऱ्या शिक्षकांमुळेच मी या पदावर उत्तम काम करू शकतो. भारती विद्यापीठात शिकलो ही भाग्याची गोष्ट आहे. एक माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान आहे. मी नेहमीच कॉलेजला सहकार्य करेन. वरूण सत्याचारी यांचा स्टार अल्युमिनीया म्हणून सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन आशा नायकवडी यांनी केले. अहवाल वाचन डॉ. विशाल घोरपडे व ट्रेझरर रिपोर्ट सुदैवी कदम यांनी वाचून दाखवला. आभार सचिन सकटे यांनी मानले.
यावेळी सतीश साळवी, स्वाती कुरणे, सिंधू गायकवाड, शार्दुल जाधव, अर्चना धनवडे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बऱ्याच वर्षांनी एकमेकांशी माजी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे भाव दिसून आले.