BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

रुग्णालयात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची - डॉ. आर. बी. कुलकर्णी भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत


रुग्णालयात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची -  डॉ. आर. बी. कुलकर्णी
भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)


रुग्णालय लहान असो वा मोठे डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून परिचारिका काम करत असतात. डॉक्टरांपेक्षा परिचारिकांचे महत्त्व आपणास अधोरेखित करावे लागेल. २४ तास त्या रुग्णावर लक्ष ठेवून असतात. यामुळेच रुग्णालयात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत भारती विद्यापीठ सांगलीचे शैक्षणिक संचालक डॉ. आर. बी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 

येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाच्या दीक्षारंभ समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुलांनो तुम्ही लक्ष देवून अभ्यास करा. वैद्यकीय क्षेत्रात तुमचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असल्याचा संदेश त्यांनी दिला. 

मान्यवरांसह भारती विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी केले. यामध्ये बीएस्सी नर्सिंग, पीबीबीएस्सी नर्सिंग, एमएस्सी नर्सिंग या तिन्ही अभ्यासक्रमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉ. आर. पी. लिमये, डॉ. अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, नर्सिंग अधीक्षक वरदा सावर्डेकर, प्रशासकीय अधिकारी अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

डॉ. सारा धनवडे,  वरदा सावर्डेकर यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. धनराज बाबू,  सचिन सकटे,  शेफाली दारूवाला,  डॉ. विशाल घोरपडे, डॉ. बाहुबली गेद्दुगोळ, अर्चना धनवडे,  स्नेहलता रेड्डी, शार्दुल जाधव उपस्थित होते.

सूत्रसंचालन निकिता भंडारी तर आभार स्वाती कुरणे यांनी मानले.