BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

रुग्णांसाठी परिचारिकांचे कार्य उत्तम - लेफ्टनंट कर्नल मनोमनी वेंकट - भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा



 रुग्णांसाठी परिचारिकांचे कार्य उत्तम - लेफ्टनंट कर्नल मनोमनी वेंकट | भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा शपथग्रहण सोहळा 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे) 

भविष्यात रुग्णांसाठी चांगले काम करा कारण रुग्णांसाठी परिचारिकांचे कार्य उत्तम असल्याचे मत निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोमनी वेंकट यांनी व्यक्त केले.


येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयातील बीएस्सी नर्सिंगच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा १९ व्या बॅचच्या अभ्यासक्रमाचा दीपप्रज्वलन आणि शपथग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. नर्सिंगच्या जनक मिस फ्लोरेन्स नाइटिंगेल आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. धनराज बाबू यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नर्सिंग व्यवसायाची शपथ दिली.

प्रमुख पाहुणे मनोमनी वेंकट म्हणाल्या, भारती विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एक सर्वोत्तम विद्यापीठ आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नशीबवान आहात. भारती विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी नर्सिंग व्यवसायातील संधी, भूमिका आणि जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. रुग्णांसोबत आपुलकीने संवाद साधा. शिस्त पाळा असे आवाहन केले.

२०२४-२५ या वर्षीचा अहवाल वाचन प्रा. डॉ. अपर्णा काळे यांनी केले. पुरस्काराचे वाचन डॉ. विजया कुंभार यांनी केले.

प्राचार्य डॉ. सुरेश रे यांनी सर्व नवीन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नर्सिंगमध्ये तुमचे भविष्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ.आर.पी. लिमये, डॉ. अजित जोशी, फिजीओथेरपी प्राचार्या डॉ. स्नेहा कटके, डेंटलचे प्राचार्य डॉ. शरद कामत, डॉ.पल्लवी जमसांडेकर, प्रा.अजित लिमये, डॉ. सरस्वती हेरवाडे, श्वेता कुलकर्णी, वरदा सावर्डेकर, संतोष मगदूम उपस्थित होते.सूत्रसंचालन सॅमसन कांबळे यांनी केले. प्रा. निकिता भंडारी यांनी आभार मानले. सर्व प्राध्यापक व पालक उपस्थित होते.