सांगली: येथील भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये मेडीसीन विभागाच्यावतीने जागतिक मधुमेह दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रदर्शन व प्रश्नमंजुषा याचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी दिली.
डीन डॉ. शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सारा धनवडे, डेप्युटी डीन डॉ. सुनील पाटील, कॉलेज ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्नेहा कटके प्रमुख उपस्थित होते.
पोस्टर प्रदर्शनातून मधुमेहाचे दुष्परिणाम, औषधोपचार, आहार या सविस्तर माहितीचे चित्रवर्णन करण्यात आले. यासाठी नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निलिमा भोरे, डॉ. रेणूका अष्टेकर, डॉ. नितीन मुदीराज, डॉ. रघुनाथ कुलकर्णी यांनी काम पाहिले. ३० विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता.
प्रश्नमंजुषेमध्ये मधुमेहावर आधारित प्रश्न होते. पाच टीमने सहभाग घेतला होता. मेडीसीन विभागप्रमुख डॉ. चिदानंद चिवटे, डॉ. आर.पी.लिमये, डॉ. गजानन बेलवलकर, नर्सिंगच्या मॉली थॉमस यांनी प्रश्नमंजुषेचे काम पाहिले. यावेळी सर्व विभागांचे सहकार्य लाभले.
डीन डॉ. शहाजी देशमुख, यांच्याहस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. स्वागत डॉ. चिदानंद चिवटे, सुत्रसंचालन डॉ. पंकज पलंगे, डॉ. हर्षल पाटील तर आभार डॉ. वसंत जाधव यांनी मानले.