BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमधे ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची केली किडनी दान - दोन गरजू रुग्णास मिळाले जीवदान


भारती हॉस्पिटलमधे ब्रेन डेड झालेल्या रुग्णाची केली किडनी दान

दोन गरजू रुग्णास मिळाले जीवदान - भारती हॉस्पिटलमधील दुसरी घटना

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती हॉस्पिटलमधून ब्रेनडेड झालेल्या एका ६० वर्षीय पुरुषाची किडनी पुणे येथे पाठवण्यात आली. अवघ्या तीन तासांत एक किडनी सिम्बायोसिस तर दुसरी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी नेण्यात आली. भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदानाची प्रकियाही करण्यात आली. अवयव खराब झाल्याने वाट पहात असणाऱ्या दोन गरजू रुग्णांना ती मिळाले असल्याचे समाधान नातेवाईकांनी व्यक्त केले.

अधिक माहिती अशी,भारती हॉस्पिटलमधील मेडीसिन विभागात सांगलीतील एका ६० वर्षीय पुरुषावर चार दिवसांपासून उपचार चालू होते. डॉ. जयश्री आवळेकर व सहकारी औषधोपचार करत होते. ते चालू असताना ब्रेनचे फंक्शन पूर्ण बंद झाले. त्यानंतर जी अवयवदान करणारी टीम आहे त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांचे प्रबोधन केले की, तुम्ही अवयवदान करू शकता. यानंतर ते तयार झाले. अवयवदान करणाऱ्या टीमने सर्व झोनल अवयवदान आणि प्रबोधन समिती पुणे यांना रुग्णाची अधिक माहिती कळवली. 

त्यानंतर संबंधित रुग्णाचा आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णाचा रक्तगट जुळला. पुणे हॉस्पिटलची टीम  भारतीत दाखल झाली. याच पार्श्वभूमीवर किडनी अत्यंत वेगाने पुणे येथे नेण्यात आली. त्याचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली. 


आज भारती हॉस्पिटलमध्ये किडनी दान करण्याची प्रक्रिया ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी भारती हॉस्पिटलमध्येच २०१९ साली पहिली घटना केली होती. आता ही दुसरी आहे.  यकृतही दान करायचे होते. काही कारणास्तव ते रद्द झाले.  भारती हॉस्पिटलसाठी ही अभिमानाची बाब आहे. डॉक्टरांच्या टीमने सर्व प्रक्रिया चांगल्या पद्धतीने हाताळली. यामुळे दोन रूग्णांचे जीव वाचणार आहेत. यासाठी भारती हॉस्पिटल नेहमीच वाटा उचलते आहे. आ. डॉ. विश्वजीत कदम यांनीही नातेवाईकांचे आभार मानले आहेत.

--- डॉ.जितेश कदम

संचालक - भारती सहकारी बँक पुणे

सध्या अवयवदान चळवळ रूजते आहे. समाजाने यात सहभाग नोंदवावा. पुणे झोनमध्ये आज अखेर १९२३ रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. अवयवदान करण्याने आपली व्यक्ती दुसऱ्याच्या रुपात पाहू शकतो. हे मोठं समाधान आहे.

--- डॉ. बिपीन मुंजाप्पा

     नेफ्रोलॉजिस्ट, भारती हॉस्पिटल सांगली

ब्रेन डेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदान करून महान कार्य केल्याचे येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे यांनी सांगितले. डीन डॉ. नितीन मुदीराज यांनी भविष्यात असे अवयवदान करून आपण रुग्णांचे जीव वाचवू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अवयवदान करावे असे आवाहन केले. 

डेप्युटी डीन डॉ.अजित जोशी, मेडीसीन, विभागप्रमुख डॉ. सी. जी. चिवटे, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. बिपिन मुंजप्पा, न्यूरोलॉजिस्ट डॉ. नमन शाह, डॉ. श्रद्धा शेटे, 

डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. दिग्विजय शिंदे, डॉ. दीपांशु, डॉ. जयदीप पाटील, डॉ. सिद्धेश शेटे, डॉ‌. वेदिका खरात यांच्यासह मेडिसीन आणि आयसीयू स्टाफ यांचे किडनी दानासाठी सहकार्य लाभले. नेत्रविभाग प्रमुख डॉ. राजेश गोटेकर यांच्यासह डॉ. नित्या शेंडे, डॉ. विराज पाटील, आय बँक समुपदेशक चंद्रकांत पाटील यांचे नेत्रदानासाठी सहकार्य लाभले.