BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भूलतज्ञ हे पडद्यामागचे कलाकार - डॉ.एच.एम.कदम | भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक भूलशास्त्र दिवस साजरा

भूलतज्ञ  हे  पडद्यामागचे  कलाकार - डॉ.एच.एम.कदम |
भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक भूलशास्त्र दिवस साजरा 


सांगली |   १९ /१०/२०२२   - (रोहित रोकडे)

भूलशास्त्र व भूलतज्ञ हे विविध शस्त्रक्रियांच्या यशस्वितेत सिंहांचा वाटा उचलत असतात. त्यामुळे त्यांची भूमिका वैद्यकीय क्षेत्रात अतिशय महत्त्वाची असून ते पडद्यामागचे कलाकार असल्याचे प्रतिपादन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम. कदम यांनी केले. 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक भूलशास्त्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी ते बोलत होते. डीन डाॅ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अजित जोशी, विभाग प्रमुख डॉ.ज्योत्सना परांजपे, डॉ.वसुधा जाधव उपस्थित होते. यावेळी पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यातून भूलशास्त्रांचा इतिहास उलगडला. एक चित्रफितही दाखवण्यात आली. 

डॉ.सारा धनवडे यांनी भूलशास्त्र तज्ञांचे रुग्णालयातील आधारस्तंभ म्हणुन कौतुक केले. भूलशास्त्राच्या व्याप्ती बद्दल माहिती दिली.

डाॅ.ज्योतस्ना परांजपे म्हणाल्या, हृदय, मेंदू, फुप्फुसे, मुत्रपिंडे, मणके, अस्थिभंग आदींसाठी करण्यात येणारी तपासणी व शस्त्रक्रिया भूलतज्ञांच्या सक्रीय सहभागातून यशस्वी होतात. कृत्रिम अवयवरोपण करताना नि केल्यावर रुग्णांची देखभाल भूलतज्ञच करत असतात.

भारती हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वेदनाशमन कक्ष डॉ.वसुधा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून ही सेवा रुग्णालयाच्या तुरची येथील सेंटरमध्येही उपलब्ध करण्यात आली आहे. 

दरम्यान भूलतज्ञांची राष्ट्रीय संघटना यंदा ७५ वा अमृतमहोत्सवी  वाढदिवस साजरा करत आहे. त्याची ज्योत संपूर्ण देशभर फिरवली जात असून  १६ ऑक्टोंबर रोजी ती सांगलीत आली. भारती हॉस्पिटलमध्ये मानद संचालक डॉ.एच.एम. कदम, डाॅ. वसुधा जाधव, डाॅ ज्योतस्ना परांजपे, कार्यवाह डाॅ. रुपाली गोरगिळे यांनी स्वागत केले. वॉकेथॉन ही प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये भारती हॉस्पिटलमधील सर्व भूलतज्ञ तसेच सांगली - मिरज शाखेचे ४० भूलतज्ञ सहभागी झाले होते. 

वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कौशल्यविकास करण्यासाठी भारती हॉस्पिटलने पाश्चात्य देशाच्या धर्तीवर अद्ययावत स्किल लॅब उभारली आहे. शिकाऊ डॉक्टरांना भुल देणे, शिरा, रक्तवाहिनी, नसा यांवर इंजेक्शन देणे, शरीरातील नको असलेले पाणी काढणे, शस्त्रक्रिया करणे इतकेच काय प्रसुती घडवून आणणे यांसारख्या गोष्टी डमी बॉडीजवर सराव करण्याची मुभा दिली जाते.  

    डेेप्युुटी डीन डाॅ. पंकज पलंगे, डाॅ. नितिन मुदीराज, वैद्यकीय उपअधीक्षक डाॅ. शिल्पा गायकवाड, डॉ.सुहास कुंभार  व इतर सर्व विभागांचे प्रमुख व भूलशास्त्र  विभागातील सर्व प्राध्यापक, डॉक्टर व विधार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डाॅ. तृप्ती देशपांडे, डाॅ. सुनंदा बंडगर, डाॅ. वर्षा पाटील, डाॅ. शिल्पा पवार, डाॅ. प्रणिता, डॉ. मधुजा, डाॅ. प्रियांका आदींनी केले.सूत्रसंचालन डॉ.मुदिता वर्मा तर आभार डॉ.मधुजा यांनी मानले.