BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात संपन्न


भारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे उत्साहात संपन्न

भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली - रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.डी.वाय.पाटील अभिमत विश्वविद्यालय मुंबईचे माजी कुलगुरू डॉ. शिरीष पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम होते. विद्यार्थ्यांनी केलेले 'पोलराईज' मॅगझिनचे प्रकाशन  प्रमुख पाहुणे डॉ.शिरीष पाटील यांनी केले. ते म्हणाले, स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब राज्याच्या राजकारणात सक्रिय असूनदेखील त्यांनी भारती विद्यापीठावर चांगले लक्ष ठेवले होते. त्याची प्रचिती दिल्ली, मुंबई, सांगलीचे शैक्षणिक संकुल बघितल्यावर येते. भरपूर स्वच्छता येथे आल्यावर पाहायला मिळते. डॉ.पतंगराव कदम साहेब नसले तरी त्यांची एक उर्जा या शैक्षणिक संकुलात पाहायला मिळते. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे सर्वच ठिकाणी जातीने लक्ष असते. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे ते फोकस करतात. 

पुढे त्यांनी सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमधून एक उत्तम डॉक्टर बनण्याचा सल्ला दिला. भविष्यात एक चांगल्या पद्धतीने रुग्णांची सेवा करण्यास सांगितले. 

दरम्यान प्रकाशित केलेल्या पोलराईज मॅगझिनचे कौतुक त्यांनी केले. मॅगझिन अध्यक्ष पलक डोडिया, राजनील पाटील व सर्व मॅगझिन बनवणारी संपादकीय मंडळ यांचे मान्यवरांनी कौतुक केले. यामध्ये वर्षभरात झालेले कार्यक्रम त्यामध्ये गॅदरिंग, क्रीडा, गणपती बाप्पांसह होळीचे सर्व फोटो आणि लेख, कविता , अनुभव विद्यार्थ्यांनी मांडले आहेत. दरवर्षी ते निघणार आहे.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, डॉ.अजित जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉक्टरांच्या सेवेला सलाम करुन त्यांनी सर्वांना डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या.

डेप्युटी डीन डॉ.नितीन मुदीराज, डॉ.आर.पी.लिमये, डॉ.पंकज पलंगे यांच्यासह डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन विक्षृती शहा, खुष्मिदा मणेर यांनी केले. डॉ.प्रिया पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. आभार डॉ.प्रिया पाटील यांनी मानले.