BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक संधिवात दिवस संपन्न


भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक संधिवात दिवस संपन्न

भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये जागतिक संधिवात दिवस साजरा करण्यात आला. अस्थिरोग विभागामार्फत याचे आयोजन केले होते. संधीवाताबरोबर कसे जगावे ही यावर्षीची थीम होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, विभागप्रमुख श्रीकांत देशपांडे, स्कूल ऑफ फिजीओथेरपी प्राचार्या डॉ.स्नेहा कटके प्रमुख उपस्थित होते.

पोस्टर प्रदर्शनचे उद्घाटन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी केले. त्यामध्ये संधीवाताचे प्रकार सांगण्यात आले. कोणत्या सांध्यांचे संधीवात, त्याचे विविध टप्पे आणि त्या टप्प्यानुसार केले जाणारे उपचार याविषयी माहिती देण्यात आली.

डॉ. अजित जोशी यांनी संधिवात झाल्यावर कोणता व्यायाम करावा ते सांगितले. डॉ.श्रीकांत देशपांडे यांनी वयोमानानुसार संधीवाताचे प्रकार सांगितले.

डॉ.सुनिल पाटील यांनी इम्फलिमेंटरी आर्थरायटिस याविषयी माहिती दिली. 'गाऊट' आजाराबाबतही सांगितले.आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा याची सविस्तर माहिती सांगून या संधीवातासोबतच कसं जगायचं हे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. सुजय महाडिक म्हणाले, सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ९० टक्केंच्यावर यशस्वी होतात. त्याचबरोबर सांधा, खुबा, गुडघा, खांदे किंवा लहान जॉइंट  सायलास्टिक रिप्लेसमेंट याही शस्त्रक्रिया होतात. येत्या काही दिवसांत रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट तेही सवलतीच्या दरात भारती हॉस्पिटलमध्ये चालू होणार आहेत. 

सूत्रसंचालन डॉ. स्वप्नील दाते यांनी केले.  डॉ. शिल्पा गायकवाड, डॉ.सचिन शेट्टी, डॉ.पंकज पलंगे, डॉ.भरत पवार, डॉ.निल बेलसारे, डॉ.श्रेयांश पांडे यांच्यासह सर्व डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.