भारती हॉस्पिटलमध्ये ७८ वर्षीय वृद्धेवर जॉइंट रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. सुजय महाडिक यांनी जोखीम स्विकारत बसवला नवा खुबा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका ७८ वर्षीय वृद्धेवर जॉइंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली. अस्थिरोग तज्ज्ञ सर्जन डॉ. सुजय महाडिक यांनी तासाभरात ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. याआधीही डॉ.सुजय महाडिक यांनी वय वर्षे १००, ९०, ८०, गाठलेल्या रुग्णांवर खुब्याची शस्त्रक्रिया केली असल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले.
अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ.श्रीकांत देशपांडे, डॉ.अनुराज, डॉ.प्राजक्ता यांच्यासह भूलतज्ज्ञ डॉ.तृप्ती देशपांडे, डॉ.मृणालिनी कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम म्हणाले, भारती हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. २४ तास येथे सेवा दिली जाते. एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मोठ्या शहरात जायची आवश्यकता नाही. नातेवाईकांचा वेळ वाचणार असून उपचारसुद्धा तात्काळ होतात. आ.डॉ.विश्वजीत कदम व भारती हॉस्पिटल पूणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे विकसित आहे. तज्ञ डॉक्टरांची टीम असून आरोग्यविषयी सर्व योजना येथे चालू आहेत.
शरीरातील प्रत्येक अवयव जसा महत्त्वाचा आहे. तसे सांधेदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडतात. त्यातीलच माणसाचा खुबा हा सांधा अतिशय महत्त्वाचा आहे. तो पूर्ण शरीराचा भार पेलतो. पण एखादा माणसाच्या खुब्यालाच दुखापत झाली तर...
असंच एका वृद्धेचं झालं ती पाय घसरून घरातच पडली. अन् उजव्या बाजूला खुब्याजवळ फ्रॅक्चर झाले. त्यांचा खुबा मोडला. महिनाभरापूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी भारती हॉस्पिटलमध्येच डॉ.सचिन गावडे यांनी केली होती. आजीबाईंचे हृदय २७ टक्के काम करत होते. त्यांना साखर, रक्तदाब याचा त्रास होता. या कारणामुळे शस्त्रक्रिया करायची म्हणजे फार मोठा धोका होता. त्यामुळे बाहेरील डॉक्टर शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते. परंतू भारती हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ही जबाबदारी पेलली. आणि डॉ.सुजय महाडिक यांनी साधारण तासाभरात यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडली. काही दिवसांनी आजीबाईंना घरी सोडण्यात आले.
नातेवाईकांनी भारती हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले. यासाठी डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांचे सहकार्य लाभले.