राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचा संदेश देणारी भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाची रॅली
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेजमध्ये हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. एनएसएस युनिटच्या बॅनरखाली विद्यार्थी आणि समुदायामध्ये देशभक्तीची भावना साजरी करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
नर्सिंग महाविद्यालय ते विजयनगर चौक अशी रॅली काढली.राष्ट्रीय अभिमान आणि एकतेचा संदेश देणारी ही रॅली असल्याचे नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी सांगितले. शैक्षणिक संचालक डॉ. आर. बी. कुलकर्णी, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कामत, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ ऑप्टोमेट्रीचे प्राचार्य अजित लिमये, तेजस्विनी चौगुले, एनएसएस अधिकारी रोहित कांबळे, प्राध्यापक, एनएसएस स्वयंसेवक आणि प्रथम वर्ष बी.एस्सी. नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते.