BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

जिल्ह्यात प्रथमच भारती हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी


जिल्ह्यात प्रथमच भारती हॉस्पिटलमध्ये २५ वर्षीय महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी 
 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात २५ वर्षीय महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्या महिलेच्या हृदयाशी संबंधित दोन शस्त्रक्रिया सीव्हीटीएस सर्जन डॉ.रणजितसिंह जाधव यांनी ४ तासात केल्या. येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ.सचिन गावडे यांना RSOV या आजाराची शंका आली.

रूग्णाचा सीटी स्कॅन केला. डॉ. भुवन यांनी निदान केले. ACUTE RUPTURED AORTIC LEFT SINUS OF VALSALVA (ROSV) TO LV WITH MODERATE TO SEVERE ACUTE AR AND MODERATE MR WITH MODERATE PH हे निदान सीव्हीटीएस सर्जन डॉ.रणजित जाधव यांना सांगितले. 

डॉ.रणजितसिंह जाधव म्हणाले, डावे हृदय फेल झाले होते. रुग्णाच्या फुप्फुसाला सुज आली होती, पाणी भरले होते. दरम्यान रुग्णाची अत्यावस्था होत होती. भरती केल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवले होते. रक्त रिझर्व्ह करून शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. जिल्ह्यात पहिल्यांदाच ही शस्त्रक्रिया केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याचा सक्सेस रेट फारच कमी आहे. शस्त्रक्रिया नाही केली तर मृत्यु अटळ असतो. 

या शस्त्रक्रियेमध्ये RSOV रिपेअर विथ सिंथेटिक ग्राफ आणि इमर्जन्सी AVR हे दोन्ही शस्त्रक्रिया एकाचवेळी करून रुग्णाला स्टेबल कंडिशनमध्ये आणले. फार दुर्मिळ ही शस्त्रक्रिया आहे. ०.००९ टक्के इतके कमी म्हणजे क्वचितच रुग्ण आढळतो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आठव्या दिवशी घरी सोडण्यात आले. 

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे यांच्यासह परफ्युजनिस्ट आशिष सर्वगोडे, ऋषिकेश शिंदे, तेजस केदार विशाल महिंद्रकर व टीमने सहकार्य केले.

रुग्णाच्या दोन हृदयाच्या शस्त्रक्रिया असल्याने रुग्णाचा फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स सर्व काही योजनेच्या अधिकाऱ्यांना सादर केले होते. तरीसुद्धा त्यांनी या शस्त्रक्रियेचा प्रस्ताव स्वीकारला नाही. रुग्णालयाला शस्त्रक्रियेसाठी पन्नास टक्के नुकसान सोसावे लागले.

हॉस्पिटलमध्ये कार्डियाक अनेस्थिशिया इमर्जन्सी केससाठी ताबडतोब उपलब्ध न झाल्याने वैद्यकीय परीक्षेत प्रथम आलेला डॉ.अनिलकुमार यांनी डॉ.रणजित जाधव व भूलतज्ज्ञ डॉ.ज्योत्सना परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी स्विकारली. ती यशस्वीपणे संपन्न झाली. त्यांचे कौतुक करण्यात आले.