भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात CPD कार्यक्रम
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय यांनी सतत व्यावसायिक विकास (CPD) कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबई यांनी १० क्रेडिट पॉइंट्स मान्यता देण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी दिली.
१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाचा विषय होता गुणवत्तापूर्ण सेवेसाठी नव्या नर्सिंग पद्धती. या कार्यक्रमाचा उद्देश परिचारिकांना रुग्णांची स्थिती लवकर ओळखणे, रुग्ण सुरक्षा, प्रभावी संवाद, रुग्ण-केंद्रित सेवा आणि परिचारिकांच्या कल्याणावर भर देऊन सेवेत गुणवत्ता वाढवणे हा होता.
उद्घाटन समारंभ महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या निरीक्षक श्रीमती स्नेहा श्रीहरी महिंद्रकर, आयोजन समिती अध्यक्ष व प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे, भारती हॉस्पिटल नर्सिंग अधीक्षक सरस्वती हेरवाडे तसेच विभागप्रमुख डॉ. बसवंत धुडुम यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाची माहिती डॉ. सुरेशकुमार रे यांनी स्पष्ट केला.
सत्रांचे मार्गदर्शन डॉ. धनराज बाबू, डॉ. बसवंत धुडुम, सतीश साळवी, विशाल घोरपडे आणि सॅमसन कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती जेसिका माळी तर आभार प्रा. योगेश भोसले यांनी मानले.
