BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात महिला दिन उत्साहात



भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात महिला दिन उत्साहात 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

प्रत्येक क्षेत्रात महिलांची संख्या मोठी आहे. त्या उच्च पदावर काम करतात. त्यांचा अभिमान आपण सर्वांनी नक्कीच बाळगला पाहिजे असे मत नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी व्यक्त केले. येथे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.


भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, प्रशासकीय अधिकारी श्वेता कुलकर्णी, नर्सिंग अधीक्षक वरदा सावर्डेकर,  हॉस्टेलच्या रेक्टर सुलभा जगताप, निलम पाटील प्रमुख उपस्थित होत्या. 

प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्व महिलांचा सन्मान केला. ते म्हणाले,मुलगी शिकली प्रगती झाली असे आपण म्हणतो कारण ती कुटुंबाचा आधार असते. त्यावरच आपण उभा असतो. आपल्या जीवनात 'ती' ची भूमिका महत्त्वाची असते.

डॉ. सारा धनवडे म्हणाल्या, समाजात प्रत्येक स्त्रीला मानाचे स्थान आहे. प्रत्येक मुलगी शिकलेली आहे. स्वतःच्या पायावर आज ती उभी आहे.

श्वेता कुलकर्णी म्हणाल्या,सशक्त महिला म्हणजे सशक्त समाज.गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन करण्यासाठी प्रथम महिला सशक्त झाल्या पाहिजेत म्हणजेच समाज सशक्त होईल याच भावनेतून समाजाला सशक्त करण्यासाठी आरोग्य क्षेत्रात महिला केवळ सेवा देत नाहीत, तर त्या संवेदनशीलता, समर्पण आणि नेतृत्व यांचे उत्तम उदाहरण घालून देतात. आरोग्य व्यवस्थेच्या उभारणीत आणि समाजाच्या आरोग्य संवर्धनात महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम, स्वप्नाली विश्वजीत कदम आणि भारती हॉस्पिटल पूणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप यांचे कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देते.

वरदा सावर्डेकर यांनी पुरूषांचा पाठिंबा असल्याने आज महिला सक्षम असल्याचे सांगितले.सुलभा जगताप म्हणाल्या, आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्त्री सर्व क्षेत्रात वावरत आहे. या गोष्टीचे समाधान आणि कौतुक आहे. सूत्रसंचालन प्रा. योगेश भोसले यांनी केले.यावेळी सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.