BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती मेडीकल कॉलेज व रूग्णालयातर्फे प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता रॅली -अँटीबायोटिकच्या वापराबाबत प्रबोधन


भारती मेडीकल कॉलेज व रूग्णालयातर्फे प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता रॅली -अँटीबायोटिकच्या वापराबाबत प्रबोधन

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय मेडिकल कॉलेज व रूग्णालय यांच्यावतीने प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांची जयंती (८ जानेवारी) आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार डॉ. विश्वजीत कदम  (१३ जानेवारी) यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भारती रूग्णालयात स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीस सुरवात झाली. सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिल्पा शहा यांनी प्रास्ताविक केले. ही रॅली प्रतिजैविकांच्या योग्य वापराबद्दल जनजागृती करण्यासाठी

भारती रूग्णालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली. यावेळी पथनाट्य व माहितीपत्रकांद्वारे जनजागृतीपर संदेश देण्यात आले. यात पूर्वपदवीधर, पदव्युतर विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्रतिजैविके ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात व योग्य कालावधीसाठी घेणे आवश्यक आहे. सध्या सोशल मीडिया व अनेक अनधिकृत चिकीत्सकांच्या सल्ल्यामुळे चुकीचे व अर्धवट डोस दिले जातात. गरज नसताना अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. त्यामुळे जंतू त्यांना दाद देत नाहीत. जंतूंची प्रतिकार शक्ती वाढलेली आहे. शिवाय आता आपल्याकडे खूप नवीन प्रतिजैविके उरलेली नाहीत. त्यामुळेच डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात त्यांचा वापर न केल्यास आपणास उपचार नसणाऱ्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. हिच जनजागृती जनमानसात व्हावी यासाठी रॅली काढण्यात आली.  यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपाधिष्ठाता डॉ. रामचंद्र लिमये, डॉ. अजित जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

 डॉ. शुभांगी गाडगीळ, डॉ. रवींद्र मोहिते, डॉ. रोहिणी सुर्यवंशी, डॉ. निलम अत्तार, डॉ. निशा कारंजे, डॉ. अमृता तुरंबेकर, डॉ. प्रिती इंगलगी यांनी या उपक्रमाचे संयोजन केले.