भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये समाज प्रबोधन सप्ताह साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये समाज प्रबोधन सप्ताह साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुरेश रे. यांनी आयोजन केले.
यानिमित्त कलेक्टिव्ह गुड फाउंडेशन यांच्या सहकार्याने ०९ जानेवारी रोजी कॉलेजमध्ये साधिका यांचे व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला २८ प्राध्यापक वर्ग व ९० जण सहभागी झाले होते.
या ऑनलाइन जनजागृती सत्रामध्ये मासिक पाळी स्वच्छता व सामान्य स्त्रीरोग समस्या यांवर भर देण्यात आला. सदर सत्र सहाय्यक प्राध्यापक श्रीमती अर्चना धनवडे यांनी घेतले. त्यांनी मासिक पाळी स्वच्छतेचे महत्त्व, PCOD व PID याबाबत माहिती तसेच आरोग्यदायी जीवनशैली, ताणतणाव व्यवस्थापन व वेळेवर उपचार यांचे महत्त्व स्पष्ट केले.
हे सत्र माहितीपूर्ण व संवादात्मक ठरले. साधिका यांना स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जागरूकता व आत्मविश्वास मिळाला. एकूणच हा कार्यक्रम यशस्वी ठरून महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरला.
