BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णाची जागृतावस्थेत बायपास शस्त्रक्रिया - सीव्हीटीएस डॉ. रणजित जाधव व टीमचे यश


भारती हॉस्पिटलमध्ये रुग्णाची जागृतावस्थेत बायपास शस्त्रक्रिया - सीव्हीटीएस डॉ. रणजित जाधव व टीमचे यश 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती हॉस्पिटलमध्ये एका ८० वर्षीय वृद्धेवर जागृतावस्थेत बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. अवघ्या पावणे दोन तासात सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजित जाधव, भूलतज्ञ डॉ. सम्राट मदनाईक व टीमने ही शस्त्रक्रिया पार पडली. मुंबई, बेंगलोर याठिकाणी होणारी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया प्रथमच भारती हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. महात्मा फुले योजनेत ही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजित जाधव यांनी दिली.

अधिक माहिती अशी की, सदरच्या वृद्धेस छातीत दुखणे, धाप लागणे ही लक्षणे जाणवली. प्राथमिक तपासणी केली असता हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज आढळून आले. या रुग्णाला फुप्फुसाचा आजार असल्याने शस्त्रक्रियेपूर्वी शारीरिक व श्वसन कार्यक्षमता तपासली. यामध्ये श्वास घेण्याच्या प्रयत्नात घट झाली होती असे निदान झाले. श्वसनाचा अतिरिक्त साठा मर्यादित असल्याचे आढळले. रुग्णाला छातीत दुखत असल्याने पल्मनरी फंक्शन टेस्ट टाळण्यात आली.

छातीच्या पिंजऱ्यापुरतीच पाठीच्या मणक्यात भूलतज्ञ डॉ. सम्राट मदनाईक यांनी भूल दिली. छातीच्या पिंजऱ्याला वेदनाविरहित केले. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला बोलता येत होते.

मुंबई, बेंगलोर या मोठ्या शहरात होणारी शस्त्रक्रिया भारती हॉस्पिटलमध्ये झाली ही अभिमानाची बाब आहे. सीव्हीटीएस सर्जन डॉ. रणजित जाधव व टीमचे कौतुक आहे. देशात काही ठराविक डॉक्टरच अशी शस्त्रक्रिया करतात अशी माहिती आहे. विशेष म्हणजे बाहेरच्या ठिकाणी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. पण येथे ती शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेत करण्यात आली. बऱ्याच दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया भारती हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत. विविध योजना चालू आहेत. रुग्णांवर एकाच छताखाली येथे उपचार केले जातात. तज्ञ डॉक्टर मंडळी येथे कार्यरत आहेत. 

---आ. डॉ. विश्वजीत कदम
कार्यवाह व प्र. कुलगुरू भारती विद्यापीठ पुणे

आणि रुग्णाला जागृत ठेवून शस्त्रक्रिया प्रथमच केली.ही शस्त्रक्रिया कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेदरम्यानच्या गुंतागुंतीशिवाय यशस्वी पूर्ण झाली. रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता भासली नाही.

डॉ. रणजित जाधव यांनी सांगितले की, वृद्ध रुग्णांना श्वसनाचा गंभीर आजार आहे त्यांना ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते. सदर रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर ३ तासात चालवण्यात आले. २४ तासात आयसीयुच्या बाहेर काढले आणि तिसऱ्या दिवशी सोडण्यात आले. हा रिकव्हरीचा वेळ रुटीन केसपेक्षा तीन पटीने कमी होता.

ज्युनिअर रेसिडेंट डॉ. रश्मी यादव, डॉ. करण जोशी, कार्डियाक अनेस्थेटिसट कन्सल्टंट डॉ. सम्राट मदनाईक, परफ्युजिनिस्ट आशिष डेव्हिड, ऋषिकेश शिंदे, प्रणय, कार्डिओलोजिस्ट डॉ. रोहित श्रीवास्तव,इंटरव्हेनशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिनव मोहन आयसीयू इंन्टेन्सविस्ट डॉ. वैभव शिंदे यांच्यासह सर्व नर्सिंग स्टाफचे सहकार्य लाभले.