नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी संसर्ग नियंत्रण विषयावर इंडक्शन कार्यक्रम संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग येथे P.B.B.Sc. (N) व M.Sc. (N) नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी संसर्ग नियंत्रण विषयावर इंडक्शन कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांचे सहकार्य लाभले.
हा कार्यक्रम भारती हॉस्पिटल, सांगली येथील संसर्ग नियंत्रण विभागाच्या सहकार्याने कॉलेज ऑफ नर्सिंगच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात रुग्णालयातील संसर्ग नियंत्रण पद्धती, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन, हातांची स्वच्छता व मानक प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना क्लिनिकल प्रशिक्षणादरम्यान संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणाच्या सुरक्षित पद्धतींचे महत्त्व समजण्यास मदत झाली. कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माहितीपूर्ण व उपयुक्त ठरला.

