BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटल अवयवदान जनजागृती करण्यात नेहमीच अग्रेसर


भारती हॉस्पिटल अवयवदान 
जनजागृती करण्यात नेहमीच अग्रेसर 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती हॉस्पिटलमधील डॉक्टर अवयवदान करण्यासाठी नेहमीच जनजागृती करतात असे मत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीचे ऑर्गन डोनेशन कोर्डिनेटर अविनाश शिंदे यांनी व्यक्त केले. नुकतेच भारती हॉस्पिटलमध्ये अवयवदान केलेले स्व. अस्लम गुलाब शिकलगार यांचे नातेवाईक रिझवाना शिकलगार, शबाना शिकलगार, मलिक शिकलगार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ते बोलत होते.

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. आशुतोष श्रीवास्तव, नेफ्रोलॉजी विभाग प्रमुख डॉ. बिपीन मुंजाप्पा, मेडिसिन विभागाच्या डॉ. जयश्री आवळेकर, डॉ. अस्मिता कर्नाळकर, डॉ. दिप्ती कुलकर्णी, सरस्वती हेरवाडे उपस्थित होत्या. 

डॉ. अविनाश शिंदे म्हणाले, ३-१३ ऑगस्ट हा जागतिक अवयवदानाचा पंधरवडा होता.  येथे मेंदूमृत नातेवाईकांना अवयवांना संदर्भात केले जाणारे प्रबोधन फार महत्त्वाचे आहे. समुपदेशन होणे गरजेचे आहे. लोकांचे जीव वाचायला पाहिजेत. अवयवदानासाठी समोर आले पाहिजे. भारती हॉस्पिटलमध्ये यासाठी नोंदणी करावी. जास्तीत जास्त युवक युवती यांनी अवयवदानाचा संकल्प करावा. जेणेकरून या मोहिमेला सक्रिय बळ मिळेल. 

अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज म्हणाले, अवयवदान केल्याने अनेकांचे आयुष्य बदलू शकते. याबद्दल समाजात जागृती होणे महत्त्वाचे आहे. यासाठी भारती हॉस्पिटलने नेहमीच पुढाकार घेतला आहे.डॉ. सारा धनवडे म्हणाल्या, अवयवदान करण्यासंदर्भात गैरसमज दूर झाले पाहिजेत.