भारती हॉस्पिटलमध्ये स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी पुनर्वसन मेळावा २०२६ संपन्न | रिहॅबिलिटेशन कार्यक्रमाचा १०० लाभार्थ्यांना फायदा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
Association of People with Disability (APD), भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, स्कूल ऑफ फिजिओथेरपी आणि कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी पुनर्वसन मेळावा २०२६ संपन्न झाला. यामध्ये लाभार्थ्यांनी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला.
Connecting Care. Inspiring Independence या संकल्पनेवर आधारित या तीन दिवसीय मेळाव्याचा उद्देश स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी झालेल्या व्यक्तींना सर्वसमावेशक वैद्यकीय व पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देणे हा होता. कार्यक्रमात रुग्ण, काळजीवाहक, डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, विद्यार्थी आणि पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते.
मेळाव्यात अस्थिरोगशास्त्र जनरल सर्जरी, युरोलॉजी आणि न्यूरोलॉजी या विभागांमध्ये तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला व आवश्यक निदानात्मक तपासण्या करण्यात आल्या. जवळपास १०० स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी झालेल्या व्यक्तींना या वैद्यकीय व पुनर्वसन सेवांचा लाभ मिळाला.
या मेळाव्यास असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसॅबिलिटी (एपीडी) यांच्याकडून डॉ. देवांजन बराल, MBBS, MD (PMR), सहाय्यक प्राध्यापक, सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, बेंगलोर आणि डॉ. धनुष एम., PMR निवासी डॉक्टर, सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, बेंगलोर यांनी फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन क्षेत्रातील मार्गदर्शन दिले. तसेच डॉ. ॲलेस जेबा जे. PT, Phd, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन आणि डॉ. जोसीहा डॅनियल, स्टेट हेड महाराष्ट्र, PT डॉ. सचिन शेट्टी असोसिएट प्रोफेसर भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी यांचे मार्गदर्शन लाभले.
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, सांगली येथील तज्ज्ञ वैद्यकीय पथकात युरोलॉजिस्ट डॉ. झैन तांबोळी, डॉ. कौस्तुभ वैद्य, डॉ. संजय पुरोहित, न्यूरोलॉजिस्ट डॉ. श्रद्धा शेटे तसेच स्पाईन सर्जन डॉ. अविराज पाटील, प्रा. डॉ. प्रतिक फणसोपकर ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी विभाग व प्रा. डॉ. मनाल अंथिकट न्यूरो फिजिओथेरपी विभाग भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी यांचा समावेश होता. त्यांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले.
स्कूल ऑफ फिजिओथेरपी येथे रुग्ण आणि त्यांच्या काळजीवाहकांसाठी मनोरंजनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे सामाजिक सहभाग, आत्मविश्वास, भावनिक स्वास्थ्य आणि समाजातील सहभाग वाढण्यास मदत झाली.
या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, नर्सिंग अधीक्षक डॉ. सरस्वती हेरवाडे, स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्या डॉ. स्नेहा कटके,वरदा सावर्डेकर, दिपमाला कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे समन्वयन APD पुणेच्या हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन पथकाने केले. या पथकात फिजिओथेरपिस्ट, पुनर्वसन तज्ज्ञ, नर्सिंग कर्मचारी आणि कम्युनिटी कोऑर्डिनेटर्स यांचा समावेश होता.
पुनर्वसन, स्वावलंबन, काळजीवाहकांना सहाय्य आणि सामाजिक समावेशकता यावर विशेष भर देण्यात आला. महाराष्ट्रातील स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी पुनर्वसन सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.सुत्रसंचालन PT डॉ. प्राची भानुशाली यांनी केले.

