भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे २० वा स्थापना दिवस साजरा
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालय सांगलीच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त ११ ऑगस्टला भारती हॉस्पिटल पूणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता ताई जगताप यांनी भेट दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांनी पुष्पगुच्छ आणि २० व्या स्थापना दिनानिमित्त तयार केलेला विशेष 'मग' देऊन त्यांचे स्वागत केले.
डॉ. अस्मिता ताई जगताप यांनी प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व स्टाफ, विद्यार्थी यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
नर्सिंग महाविद्यालयातील ५०० विद्यार्थी, नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना संबोधित केले. त्यांनी दर्जेदार शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या गरजा यावर भाष्य केले.
उत्तम शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. नर्सिंगमध्ये विद्यार्थ्यांना उज्ज्वल संधी आहे. परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.आभार प्रा. मनिषा कुलकर्णी यांनी मानले.

