BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये सांगली येथे दीक्षारंभ २०२६ इंडक्शन प्रोग्रामचा भव्य शुभारंभ


भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये सांगली येथे दीक्षारंभ २०२६ इंडक्शन प्रोग्रामचा भव्य शुभारंभ

भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली येथे ‘दीक्षारंभ २०२६’ या विद्यार्थी परिचय (इंडक्शन) कार्यक्रमाचा शुभारंभ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर श्रीमती आशा नायकवडी यांच्या प्रेरणादायी स्वागतपर भाषणाने झाला. त्यांनी 'दीक्षारंभ' हा विद्यार्थ्यांच्या नर्सिंग (परिचारिका) क्षेत्रातील व्यावसायिक प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण प्रारंभ असल्याचे अधोरेखित केले.

कार्यक्रमाची सुरुवात भारती विद्यापीठ गीताने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद कामत, नर्सिंग प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे, शिक्षक समन्वयक व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थापक स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. सहाय्यक प्राध्यापक श्रीमती स्नेहलता रेड्डी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांच्या हस्ते डॉ. शरद कामत यांचा सत्कार करण्यात आला.

 प्रमुख पाहुणे डॉ. शरद कामत यांनी नवोदित विद्यार्थ्यांना समर्पित वृत्ती, नेतृत्वगुण आणि आरोग्य सेवेप्रती निष्ठेने आपले शिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन केले.

प्राचार्य डॉ. सुरेश कुमार रे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, व्यावसायिक नैतिकता, रुग्णांची संवेदनशीलतेने आणि आपुलकीने सेवा करण्यास सांगितले. महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.

या सोहळ्यात बी.एससी. नर्सिंग  पोस्ट बेसिक बी.एससी. नर्सिंग आणि एम.एससी. नर्सिंगच्या नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना 'वेलकम किट्स' चे वाटप करण्यात आले. श्रीमती आशा नायकवडी यांनी आभार मानले.