BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा साजरा


भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान पंधरवडा साजरा 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलध्ये २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर नेत्ररोग विभागातर्फे ४१ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला. 

 अधिष्ठाता डॉ. नितीन मुदीराज यांच्याहस्ते कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय उपाधीक्षक डॉ. आशुतोष श्रीवास्तव, उपाधिष्ठाता डॉ. अजित जोशी, डॉ. राजेश गोटेकर, सरस्वती हेरवाडे, अभिजीत तोडकर, श्वेता कुलकर्णी उपस्थित होते. 

ज्यांनी नेत्रदान केले आहे, त्यांच्या नातेवाईकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांना मरणोत्तर नेत्रदान केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

डॉ. नितीन मुदीराज व डॉ. सारा धनवडे यांनी नेत्रदान चळवळ वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

डॉ. अजित जोशी म्हणाले, नेत्रदानाचा आदर्श इतर नागरिक घेतील. जागरूकता वाढेल. आणि बुब्बुळ आजारामुळे अंध रूग्णांना दृष्टी प्राप्त होईल. हा प्रामुख्याने उद्देश आहे.

नेत्रदान करण्यासाठी काय प्रकिया करावी याची सविस्तर माहिती डॉ. आयुषी सिंग, डॉ. आकांक्षा पाटील, डॉ. अनन्या ज्यायोदीया, डॉ. निशा बिराजदार यांनी दिली. 

ऑप्टोमेट्री दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करणारी नाटिका सादर केली.एमबीबीएस आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन भरवले होते. त्यातून नेत्रदानाचे महत्व विशद केले. 

वरूण सुर्यवंशी, नंदकुमार कुंभार या नातेवाईकांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन केतकी मानकर यांनी केले. डॉ. हणुमंत मंडलिक यांनी आभार मानले.