BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाची तंबाखुविरोधी रॅली



भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाची तंबाखुविरोधी रॅली

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
 
भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) कॉलेज ऑफ नर्सिंग, सांगली येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने तंबाखूमुक्ती दिनानिमित्त  दिनांक ३० मे २०२६ रोजी भारती कॅम्पसमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या रॅलीमध्ये १०० NSS स्वयंसेवकांसह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. स्वयंसेवकांनी डिजिटल बॅनर्स व जनजागृतीपर फलक हातात घेऊन तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली. “तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार”, “तंबाखूमुक्त जीवन – निरोगी जीवन” अशा विविध घोषणांद्वारे समाजामध्ये तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

हा जनजागृती उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी श्रीमती तेजस्विनी चौगुले तसेच सहायक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी श्री. रोहित कांबळे यांच्या देखरेखीखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. रॅलीदरम्यान महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख (HODs), प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आणि मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व यशस्वी ठरला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश तंबाखूच्या व्यसनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि समाजात तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रेरणा देणे हा होता. स्वयंसेवक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या एकत्रित सहभागामुळे रॅली यशस्वीरीत्या पार पडली आणि उपस्थितांना निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश देण्यात आला.
Tags