BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदान दिन साजरा

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदान दिन साजरा 


सांगली:

येथील भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक ऐच्छिक रक्तदान दिन साजरा करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी दिली. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले.



डॉ. यशोधरा गोटेकर यांनी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथेही वेबिनारमध्ये रक्तदान समज-गैरसमज या विषयावर ऑनलाईन व्याख्यान दिले. उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, ब्लड बँकेच्या प्रमुख डॉ. यशोधरा गोटेकर, पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. वैभव माने यांच्याहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र, डोनर कार्ड व पुष्प देण्यात आले.


त्यामध्ये रक्तदान का करावे, कोणी करावे यासह रक्तातील घटक कोणते, कितीजणांचे जीव वाचवू शकते अशी माहिती त्यांनी दिली. ऑनलाईन पद्धतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही डॉ. गोटेकर यांनी दिली. यावेळी डॉ.डी.जी. कणसे,  डीन डॉ. शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. नियोजन राजर्षी कदम-पाटील, रणजीत जाधव यांनी केले.