भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक स्ट्रोक दिन साजरा.
सांगली : येथील भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ रोजी जागतिक स्ट्रोक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) मेडिसिन विभाग आणि स्कूल ऑफ फिजिओथेरपी सांगली, यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस व एम.डी. एम.एस.आणि निवासी डॉक्टरांसाठी पॅनेल चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी दिली.
स्ट्रोक दिनाविषयी माहितीपूर्ण भाषणाने सत्राची सुरुवात झाली. स्ट्रोकच्या प्रतिबंधात्मक पैलू डॉ. चिंदानंद चिवटे (मेडिसिन विभाग प्रमुख), स्ट्रोक बरा होऊ शकतो- डॉ. नमन शाह (न्यूरोफिजिशियन), स्ट्रोकमध्ये इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्टची भूमिका - डॉ. अभिनव मोहन (इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट),डॉ. मनल अंतिकत (सहयोगी प्राध्यापक, BVDUSOP) द्वारे स्ट्रोक पुनर्वसन वर वर्तमान ट्रेंड आणि फिजिओथेरप्यूटिक दृष्टीकोनातील अलीकडील प्रगतीसह पुनरावलोकन, कु. साधना बुद्रुक (आहारतज्ज्ञ) स्ट्रोकमध्ये पोषण काळजी.त्यानंतर थेट प्रेक्षकांपासून सर्व पॅनेल सदस्यांपर्यंत प्रश्नोत्तरांचे सत्र झाले.
मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, अधिष्ठाता,डॉ. शहाजी देशमुख, उपअधिष्ठाता, सुनील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय उपअधीक्षक अजित जोशी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.स्नेहा कटके (मुख्याध्यापिका BVDUSOP, सांगली) यांनी मार्गदर्शन केले.
सत्राचे समन्वय डॉ. पंकज पलंगे (प्राध्यापक, मेडिसिन विभाग) आणि डॉ. सुशांत सुतार (सहायक प्राध्यापक, एसओपी) यांनी केले.डॉ. अमृता काबरा (सहायक प्राध्यापक, SOP) यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. केविन मकासरे (फिजिओथेरपिस्ट) आणि डॉ. अक्षय फडतरे (फिजिओथेरपिस्ट) यांनी मानले.