BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट फिडींग आठवडा

  भारती हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट फिडींग आठवडा

सांगली :

येथील भारती हॉस्पिटलमध्ये ब्रेस्ट फ्रिडींग आठवडा १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांनी दिली. 

यावेळी भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, अधिष्ठाता डॉ. शहाजी देशमुख, डाॅ.सारा धनवडे, डॉ. सुहास कुंभार प्रमुख उपस्थित होते. भारती हॉस्पिटल नर्स एज्युकेटर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ब्रेस्ट फ्रिडींगचे महत्व  सांगण्यात आले. मातेने बाळाला स्तनपान कधी आणि कसे करावे याचे मार्गदर्शन केले. बाळाचे एक मॉडेल घेऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. 



 

वैद्यकीय अधीक्षक डॉ. सारा धनवडे यांनी स्तनपान करताना मातांनी कशा पद्धतीने बसले पाहिजे याचे मार्गदर्शन करून स्तनपान न करण्याचे काय दुष्परिणाम होतात याची माहिती दिली.


एज्युकेटर स्विटी घाटगे, प्रिती तांदळे, अनु देवराज, मॉली सदामते यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.सुत्रसंचालन वैभव तिवडे आणि आभार स्विटी घाटगे यांनी मानले.

Tags