कर्नाटकातील रूग्णांसाठी आयुष्यमान भारत आरोग्य योजना सुरू | भारती हॉस्पिटलमध्ये माफक दरात उपचार
सांगली | भारती हॉस्पिटल न्यूज
भारती हॉस्पिटलमध्ये २०१४ पासून ही योजना चालू आहे. परंतू त्यावेळी हृदयासंबंधित आणि किडनी असे दोनच प्रकारचे उपचार करण्यात येत होते.आता हृदयशस्त्रक्रिया, किडनीसंबधित, नसांची शस्त्रक्रिया, कॅन्सर, दात, हाडांची शस्त्रक्रिया, दुभंगलेले ओठ, जबड्याची शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर व जबड्याचा कॅन्सर, टाळुवरील शस्त्रक्रिया यांसह सांधा व खुबा बदलणे, मणक्याचे फ्रॅक्चर व शस्त्रक्रिया या योजनेतंर्गत माफक दरात केली जाते.
येथे एकाच छताखाली तपासणी आणि शस्त्रक्रियाही केली जाते. स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटीसह सर्व डॉक्टर उपलब्ध असतात. अत्याधुनिक उपकरणे आहेत.बीपीएल कार्ड, एपीएल व अंत्योदय कार्डधारक या योजनेचा लाभ घेवू शकतात. मात्र तो रुग्ण हा कर्नाटक राज्यातील असावा. सोबत आधार कार्ड आवश्यक आहे.
योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व तपासण्या माफक दरात केल्या जातात. त्यांना जेवण, प्रवासखर्च, औषध याचा लाभ योजनेतून घेता येतो. अशी माहिती योजनेच्या प्रमुख डॉ. स्नेहल सगरे व डॉ. सुनिल मंडले यांनी दिली.