BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फॉरमॉकोलॉजी रिसर्च युनिट कार्यान्वित

 


भारती हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फॉरमॉकोलॉजी रिसर्च युनिट कार्यान्वित

सांगली : दि.१९/८/२००२२ 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल फॉरमॉकोलॉजी रिसर्च युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. अशा सुविधेचा दर्जेदार व नैतिक संशोधनामध्ये खूप उपयोग होत असतो. याची जाणीव ठेवून ही सुविधा कार्यान्वित केली असल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. 

फॉरमॉकोलॉजी विभागप्रमुख आणि डेप्युटी डीन डॉ. आर.पी.लिमये यांनी सांगितले की, फॉरमॉकोलॉजी रिसर्च युनिट कार्यान्वित झाल्याने मेडिकल कॉलेजच्या विभागांमध्ये  वेगवेगळ्या उच्च संशोधन होण्याच्या संधीचे दरवाजे आता उघडले गेले आहेत. सध्या येथे तीन वेगवेगळ्या विषयांतील संशोधनांना सुरुवात होत आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांनी सहभागी होण्यासाठी होकार दिला आहे.

या संपूर्ण वाटचालीत भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्वजित कदम, भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप, भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.शहाजी देशमुख, डॉ.आर.बी.कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सारा धनवडे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डेप्युटी डीन डॉ. पंकज पलंगे, डॉ.शिल्पा गायकवाड, डॉ.नितीन मुदीराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

पुढे माहिती देताना डॉ.आर.पी.लिमये म्हणाले, नुकत्याच मिळालेल्या एनएबीएच मानांकनापाठोपाठ मिळालेले हे यश भारती विद्यापीठाच्या उच्चतम सेवा देण्याच्या धोरणाचे व येथील सर्वांच्या परिश्रमाचे फळ आहे.