BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक 'कॅन्सर डे' संपन्न

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक 'कॅन्सर डे' संपन्न


( भित्ती प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अधिष्ठाता डॉ.सारा धनवडे, अजित जोशी, निलिमा भोरे, विद्या जाधव, शिल्पा गायकवाड. )

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली  | दि.१३/०२/२०२३ 

येथील भारती हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजमध्ये जागतिक कॅन्सर दिवस विविध उपक्रमांनी संपन्न झाल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम यांनी दिली.

कार्यक्रमाचे आयोजन स्त्रीरोग व प्रसूती विभाग तसेच भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज यांनी केले.  उद्घाटन अधिष्ठाता डॉ.सारा धनवडे यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजित जोशी, नर्सिंग प्राचार्या डॉ. निलिमा भोरे, डॉ.पंकज पलंगे, डॉ.शिल्पा गायकवाड, यांच्यासह डॉक्टर व प्राध्यापक उपस्थित होते.

स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.विद्या जाधव यांनी स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशयाच्या विविध कर्करोगांचे निदान करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, कॅन्सरबाबत वेळच्यावेळी वयाच्या तिशीनंतर तपासणी करून घेतलेली जास्त योग्य आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. भविष्यात होणाऱ्या कॅन्सरचे निदान लवकर होऊ शकते. मात्र त्यावर योग्य उपचाराने मातही करता येऊ शकते.  तरी समस्त महिला वर्गाने याविषयी न घाबरता भारती हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागात येवून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्व तपासण्या करून घेण्यासह त्यांचा सल्लाही ऐकावा असे आवाहन डॉ.विद्या जाधव यांनी केले. 

कॅन्सरची लक्षणे त्यावर उपाय सांगून स्त्रियांनी आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी आयोजित केलेल्या भित्ती प्रदर्शन स्पर्धेमध्ये स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या विद्यार्थ्यांनी व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

डॉ.गीता गोरे यांनी रुग्ण व नातेवाईकांसाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून व्याख्यान दिले. यावेळी आयोजित केलेल्या भित्ती प्रदर्शन स्पर्धेत स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यातून कॅन्सरबाबत जनजागृती करण्यात आली.