BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये 'कराडा स्कॅन' मशीन | शरीरातील चरबीचे प्रमाण समजणारभारती हॉस्पिटलमध्ये 'कराडा स्कॅन' मशीन |  शरीरातील चरबीचे प्रमाण समजणार

भारती हॉस्पिटल न्यूज | सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण किती आहे हे मोजण्याचे 'कराडा स्कॅन' मशीन उपलब्ध झाली आहे. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी त्याचे उद्घाटन करुन चरबी तपासली. 

आपल्या शरीरामध्ये चरबीचे प्रमाण जसे की हातावर, पोटावर, पाठीवर यासह संपूर्ण शरीराची  किती चरबी आहे हे तात्काळ समजते. जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला त्याचा आहार किती घ्यायचा किंवा काय खाल्लं पाहिजे काय नको हे आपणास ठरवता येत असल्याची माहिती आहारतज्ज्ञ धनश्री माळी यांनी दिली.

याचबरोबर व्यक्तीचा बीएमआय, रेस्टिंग मेटाबोलीजम तसेच शरीरात असणारं स्नायुंचं मास किती आहे हेदेखील समजतं. ज्यांना रक्तदाब आहे, साखर आहे अशा रुग्णांना डॉक्टर चरबी तपासून यायला सांगतात. ज्यांचं वय १४ पेक्षा कमी आणि गरोदर महिला अशांना चरबी तपासता येणार नाही. मशीनद्वारे तपासणी केल्यानंतर व योग्य आहार घेतल्यानंतर महिन्याने तपासणी करु शकतो.

डीन डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजित जोशी, व्यवस्थापक श्वेता कुलकर्णी, साधना बुद्रुक, पायल बामणे, स्वालिया बागवान, धनश्री तोडकर उपस्थित होते.