BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटल मधे ७५ वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास टाळत जीवनदान l डॉ. रियाज मुजावर यांचे कौशल्य

भारती हॉस्पिटल मधे ७५ वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास टाळत जीवनदान l डॉ. रियाज मुजावर यांचे कौशल्य 

भारती हॉस्पिटल न्यूज l सांगली

प्रसिद्ध ह्दयरोग तज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी भारती हॉस्पिटलमध्ये एका ७५ वर्षाच्या वृद्धाची दुसऱ्यांदा होणारी बायपास शस्त्रक्रिया टाळून त्याच्या हदयात IVL या  आधुनिक पद्धतीने बलून द्वारे ९९ टक्के कॅल्शियमचे ब्लॉकेज वर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिले.

विजय शामराव देशपांडे वय ७५ रा. विश्रामबाग यांच्यावर सन २०१५ मध्ये बायपास सर्जरी झाली होती.मत्र मागील काही दिवसांत पुन्हा त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांनी डॉ रियाज मुजावर यांच्या कडे दाखविले. यावेळी डॉ मुजावर यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हृदयामध्ये तसेच वायोमानानुसार कॅल्शियम जमा झाले होते त्यांच्या हृदयात ९९ % ब्लॉक आढळून आले.

सदर कॅल्शियमचे ब्लॉक असल्यामुळे व पुन्हा त्यांच्यावर बायपास करणे जोखीम असल्यामुळे डॉक्टर मुजावर यांनी IVL  या आधुनिक बलून द्वारे हृदयाच्या नाडीतील कॅल्शियम फोडून अडथळा दूर केला. त्यामुळे  त्याच्यावर एन्जोप्लास्टीद्वारे स्टेंथ बसवणे सोपे झाले . या आधुनिक बलून द्वारे कॅल्शियम फोडल्यामुळे हृदयाच्या नाडीच्या भिंतीला  पूर्णपणे चिकट होण्यास मदत झाली. त्यामुळे हृदयाचा मोठा भाग खुला झाला आणि त्यांचा रक्तपुरवठाही सुरळीत  झाला.

एकूणच त्यांचे वय पाहता त्यांच्यावर पुन्हा बायपास करणे जखमीचे असताना बायपास टाळत डॉ. मुजावर यांनी त्यांच्यावर  आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया  करून त्यांना जीवदान दिले. त्यामुळे देशपांडे यांच्या कुटुंबाने डॉ.रियाज मुजावर यांचे आभार मानले.

अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी पूर्वी पुणे मुंबई या ठिकाणी नागरिकांना जावे लागत होते मात्र सध्या आता सांगली मिरजेत सुद्धाअशा पद्धतीची आधुनिक शस्त्रक्रिया द्वारे हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून रुग्णाचे जीव वाचवता  येत असल्याचे माहिती डॉ. रियाज मुजावर यांनी दिली.