BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकदिवसीय परिषद संपन्न | २४७ डॉक्टर सहभागी

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एकदिवसीय परिषद संपन्न | २४७ डॉक्टर सहभागी 

भारती हॉस्पिटल न्यूज | सांगली - रोहित रोकडे 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये सीएमई (Continue Medical Education)  ही राज्यस्तरीय परिषद संपन्न झाली. रेडिओलॉजी व स्त्री रोग प्रसूती शास्त्र विभागामार्फत याचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील २४७ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता. याचे उद्घाटन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच. एम.कदम यांच्याहस्ते करण्यात आले. 


दिल्लीतील डॉ.अशोक खुराणा यांनी फेटल मेडीसीन संदर्भात माहिती दिली. गर्भाशयात असताना निदान व उपचार कसे करायचे हे सर्वांना सांगितले. खुराणा हे भारतातील पहिल्या तीन नंबरमधील डॉक्टर आहेत. त्यांनी ६ पुस्तके लिहिली आहेत. बाळाची वाढ कमी होणार आहे हे निदान अगोदर कसे लावायचे, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत बाळातील दोष कसे ओळखायचे, जर पाठीला बाक असेल, डोक्याची वाढ व्यवस्थित झाली नसेल तर त्यावर उपाय सांगितला.

डॉ.प्रिया देशपांडे यांनी पहिल्या तीन महिन्यांत गुणसूत्र दोष कसे ओळखायचे, बाळाची वाढ कमी असेल तर काय करावे, गरोदरपणात इंटरव्हेन्शनल प्रक्रिया कशी करायची याचे मार्गदर्शन केले. डॉ.निकीत मेहता यांनी मशीनमधील बटणं आणि त्याचा कंट्रोल योग्य प्रकारे वापरून परफेक्ट निदान कसे करायचे ते सांगितले. 

रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ.प्रदीप कुलकर्णी म्हणाले, शेवटच्या तीन महिन्यांत डॉपलरने बाळात अँनिमिया आहे का, बाळाची वाढ कशी होणार याचा अंदाज सांगितला. जर बाळाला धोका असेल तर डिलिव्हरी कशी करायची याचे मार्गदर्शन केले. 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलच्या डीन डॉ. सारा धनवडे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, नेहा गांधी, किर्ती अडवाणी यांच्यासह डॉक्टर व प्राध्यापक उपस्थित होते.

डॉ.असित नाटेकर यांनीही उपस्थितांना अनुभव सांगितले. सूत्रसंचालन विजय माने यांनी केले. स्वागत स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.विद्या जाधव तर आभार असित नाटेकर यांनी मानले.