BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदान दिन साजरा


भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदान दिन साजरा

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक रक्तदान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांच्याहस्ते करण्यात आले. 

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटलमध्ये वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जागतिक रक्तदान दिनानिमित्त ब्लड बँकेत ५१ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणे काळाची गरज आहेच परंतू ती एक आवश्यक बाब बनली असल्याचे मत डॉ.अजित जोशी यांनी व्यक्त केले. 

वाढत जाणारा रक्ताचा तुटवडा, रक्तदानाचे महत्त्व याविषयी डॉ. यशोधरा गोटेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व रक्तदात्यांना सांगितले. दरम्यान डीएमएलटीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व विविध माहितीपूर्ण असे पोस्टर प्रदर्शनही भरविण्यात आले होते. रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन पॅथोलॉजी विभागामार्फत करण्यात आले. प्रमुख डॉ. यशोधरा गोटेकर यांच्यासह डीन डॉ.सारा धनवडे, नर्सिंगच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे, नर्सिंग सुपरिटेंडंट सरस्वती हेरवाडे, श्वेता कुलकर्णी, अभिजित तोडकर उपस्थित होते. 

यावेळी नर्सिंग कॉलेज व डीएमएलटीचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. राजश्री कदम पाटील यांनी मानले.