BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये एंडोलॅप लाईव्ह २०२३ राज्यस्तरीय परिषद संपन्न


भारती हॉस्पिटलमध्ये एंडोलॅप लाईव्ह २०२३  राज्यस्तरीय परिषद संपन्न 

 भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये एंडोलॅप लाईव्ह २०२३ ही परिषद संपन्न झाली.  डेक्कन सोसायटी ऑफ गॅस्ट्रोइंटेन्सिटिनल एंडोस्कोपीस्टस आणि भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. 

परिषदेचे उद्घाटन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्याहस्ते झाले. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांच्यासह राज्यातील विविध शहरातून २०० डॉक्टर उपस्थित होते.गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलमधील पद्मश्री डॉ.रणधीर सूद आणि नायर हॉस्पिटल मुंबईचे डीन डॉ. प्रवीण राठी यांनीही विशेष हजेरी लावली.

एंडोस्कोपीची ॲडव्हान्स प्रक्रिया तसेच जटील लॅप्रोस्कोपीक सर्जरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. त्याचे थेट प्रक्षेपण उपस्थित डॉक्टरांना दाखवण्यात आले.

यामध्ये भारतातील अग्रगण्य एंडोस्कोपीस्ट आणि सर्जन बोलवण्यात आले होते. पुणे, मुंबई, कोईमतूर, दिल्ली, हैद्राबाद येथील नामांकित १० डॉक्टर आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा, अनुभवाचा लाभ उपस्थितांनी घेतला. 

एंडोस्कोपी, ईएसडी, मेटालिक स्टेटनिंग, एसटीईआर, ईआरसीपी या एंडोस्कोपी प्रक्रियेवर ऑपरेशनविना उपचार केले जातात. दोन दिवसीय परिषदेत लॅप्रोस्कोपिक फंडोप्लायकेशन हेलर्स मायोटोमी, पित्ताशय काढणे, जटील हर्निया यांसारख्या सर्जरी लाईव्ह दाखवण्यात आल्या. 

डॉ.उदयसिंह पाटील, डॉ.धरमसि, डॉ.महेश गुजर, डॉ.अभिमान पवार यांच्यासह सर्जरी, अनेस्थेशिया, मेडिसीन यांचे सहकार्य लाभले. भारती हॉस्पिटलमधील डॉ.अभिमान पवार यांनी आभार मानले.