BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान शिबीर संपन्न


भारती हॉस्पिटलमध्ये नेत्रदान शिबीर संपन्न

 भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली - रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मार्फत ग्रामीण रुग्णालय तुरची फाटा येथे जागतिक नेत्रदान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.

तुरची येथील भारती ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मीनाक्षी सावंत उपस्थित होत्या. नेत्रचिकित्सक डॉ. कमलेश म्हणाले, जे अंध आहेत त्यांना नेत्रदानाची गरज असते. त्या तुलनेत नेत्रदानाचं प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना नेत्रदानाची गरज व त्याची माहिती होणे आवश्यक आहे. त्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.

भारती हॉस्पिटल सांगलीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, नेत्र विभागप्रमुख डॉ.राजेश गोटेकर यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमात नेत्रदानाचे फॉर्मही भरले.या कार्यक्रमासाठी भारती ग्रामीण रुग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस व विद्यार्थी उपस्थित होते.