BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा

भारती हॉस्पिटल न्यूज सांगली / रोहित रोकडे 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला. अशी माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्यावतीने याचे आयोजन केले होते. उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.

मानसिक आरोग्य हा प्रत्येक मानवाचा हक्क आहे ही यावर्षीची थीम होती. यावेळी डॉ.शिल्पा गायकवाड, मानसोपचार विभागप्रमुख डॉ. सुधीर गायकवाड, डॉ. नितीन पाटील, डॉ.दशरथ सावंत, नर्सिंग उपप्राचार्य प्रवीण दाणी उपस्थित होते.  यावेळी पोस्टर प्रदर्शनचे आयोजन केले होते. त्यामधून आपले मानसिक आरोग्य किती चांगले पाहिजे हे स्पष्ट केले होते. मानसिक आरोग्य जोपासून आपल्या जीवनशैलीत बदल करु, त्याच्या काही टिप्स दिल्या होत्या.

डॉ. मधुरा घाटे यांनी या धकाधकीच्या जीवनात मानसिक आजार वाढले आहेत. त्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य जपणे गरजेचे असल्याचे सांगितले.

नर्सिंग महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर नाटक सादर केले. मानसिक धक्का बसलेल्या व्यक्तिने भोंदूबाबाकडे न जाता हॉस्पिटलमध्ये जाण्याचा संदेश उपस्थित रुग्ण व नातेवाईकांना दिला. दरम्यान सांगलीवाडी येथेही डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात पीबी बीएस्सीच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. 

सूत्रसंचालन सूजन भोसले यांनी केले. नर्सिंगचा सर्व स्टाफ, डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.