BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिवस - १२ रुग्णांना कवळी वाटप


भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिक दिवस - १२ रुग्णांना कवळी वाटप

भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / / रोहित रोकडे 

भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाच्या कृत्रिम दंत विभागाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा केला. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्याहस्ते ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या १२ रुग्णांना सवलतीच्या दरात कवळी देण्यात आली. 

ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व  विभागप्रमुख डॉ. राघवेंद्र आडकी यांनी सांगितले. ते म्हणाले, ज्येष्ठांना मान, सन्मान द्यावा. त्यांची काळजी घ्यावी. त्यांच्याशी संवाद साधावा. या कारणाने त्यांची  मानसिकता चांगली राहते. या वयात त्यांचा चिडचिडेपणा, एकाकीपणा वाढलेला असतो. त्यामुळे ते काय म्हणतात ते ऐकून घ्यावे. ज्येष्ठ मंडळी व तरुण यांच्या विचारात ५५ टक्के फरक असतो.

प्राचार्य डॉ.शरद कामत, उपप्राचार्य डॉ.जीवनाशा अग्रवाल, विभागप्रमुख डॉ.राघवेंद्र आडकी यांच्यासह सर्व डॉक्टर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.