BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची तत्परता... २१ वर्षीय युवकाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रियाभारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची तत्परता...
२१ वर्षीय युवकाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

अवघ्या २१ वर्षीय युवकाचा डावा हात शस्त्रक्रिया करून येथील भारती हॉस्पिटलमधील डॉक्टरांना वाचवण्यात यश आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या युवकावर येथील प्रमुख सीव्हीटीएस सर्जन डॉ.रणजितसिंह जाधव, डॉ.पृथ्वीराज पाटील व डॉ. श्रेया बावनकर यांनी तीन तास यशस्वी शस्त्रक्रिया केली.

सीव्हीटीएस सर्जन डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की,
हा तरुण दुचाकी अपघातात मध्यरात्री जखमी झाला. त्याला तात्काळ नागरिकांनी स्थानिक दवाखान्यात दाखल केले. परंतू तिथे उपचार अपुरे असल्याने डावा हात खराब होण्याची प्रक्रिया चालू झाली होती. याकारणाने २४ तास उशीराने रुग्ण भारती हॉस्पिटलमध्ये आला. सीव्हीटीएस विभागाने तातडीने दखल घेऊन आवश्यक त्या तपासण्या केल्या. योग्य ते निदान केले व मध्यरात्री गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करुन रुग्णाचा हात वाचवला.

यामध्ये हाताच्या मुख्य रक्तवाहिनीला मार लागल्याने ती अर्धी तुटली होती. पायातील रक्तवाहिनी काढून ती हाताला जोडण्यात आली. रुग्णाच्या हाताची रक्तवाहिनी बदलून खराब झालेल्या स्नायूंची पुनर्रचना केली. वेळेत उपचार झाले म्हणून ठीक जर उशीर झाला असता तर डावा हात काढावा लागला असता.

भूलतज्ञ डॉ. हर्षल दनिधरिया तसेच शस्त्रक्रियेनंतर हाताच्या जखमेवर उपचार करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जन डॉ.वैभव पाटील यांचे सहकार्य लाभले.

भारती विद्यापीठात अशा सर्व प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया माफक दरात होत असून रुग्णांना याचा लाभ होत आहे.