भारती हॉस्पिटलमध्ये ८५ वर्षीय वृद्धेवर जॉइंट रिप्लेसमेंटची यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ.सुजय महाडिक यांनी जोखीम स्विकारत बसवला नवा खुबा
भारती हॉस्पिटल न्यूज सांगली/रोहित रोकडे
२३/१२/२०२३
भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका ८५ वर्षीय वृद्धेवर जॉइंट रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात आली.
अस्थिरोग तज्ज्ञ असणारे सर्जन डॉ. सुजय महाडिक यांनी ३५ मिनिटात ही गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया केली. आजीबाईंना नवीन खुबा बसवला. याआधीही डॉ.सुजय महाडिक यांनी शंभरी गाठलेल्या आजींवर खुब्याची शस्त्रक्रिया केली असल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले.
डॉ.सुजय महाडिक म्हणाले, आजीबाई घरी पाय घसरून पडल्याने त्यांचा खुबा मोडला होता. त्याचे चार भाग झाले होते. शस्त्रक्रिया करायला नको अशी आजीबाईंची मानसिकता होती. त्यांना हृदयाचाही त्रास आहे. कारण हृदयापासून निघणाऱ्या मुख्य रक्तवाहिनेची त्यांना गाठ होती. किडनी आणि लिव्हर दोन्ही काम कमी करत होते. हृदयाजवळ असणारी गाठ शस्त्रक्रिया करताना फुटण्याचा धोका असतो या सर्व कारणांमुळे बाहेरील डॉक्टर ही शस्त्रक्रिया करण्यास तयार नव्हते. साधारण या शस्त्रक्रियेसाठी २ तासांचा कालावधी लागतो.
पण आजीबाईंचे वय लक्षात घेऊन त्यांना फारसा त्रास होवू दिला नाही. भूलतज्ञांच्या सहकार्याने त्यांना विशिष्ट भूल दिली. आणि अवघ्या ३५ मिनटांत कौशल्याच्या जोरावर डॉ.सुजय महाडिक यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी चालू लागल्या. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम म्हणाले, भारती हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. एखाद्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या शहरात जायची आवश्यकता नाही. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित आहे. तज्ञ डॉक्टरांची टीम असून आरोग्यविषयी सर्व योजना येथे चालू आहेत.