BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये तोंडाच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया


भारती हॉस्पिटलमध्ये तोंडाच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया

भारती हॉस्पिटल न्यूज -  सांगली (रोहित रोकडे)
दि.१८/१२/२०२३

येथील भारती हॉस्पिटलमध्ये एका ५७ वर्षीय रुग्णाच्या तोंडाच्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली.

मावा, गुटखा, तंबाखू आणि दारुच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांनी व्यसनापासून दूर राहावे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे डॉ.अमित कोले यांनी सांगितले.
हेड अँड नेक ऑन्को सर्जन म्हणून डॉ.अमित कोले कार्यरत आहेत. त्यांनी ही शस्त्रक्रिया  केली. ते म्हणाले, रुग्णाच्या तोंडात मोठी जखम होती. त्यातून रक्तस्राव होत होता. ८-९ महिन्यांपूर्वी छोटी असणारी गाठ हळूहळू मोठी होत गेली. तपासणी केली. बायोप्सीद्वारे कर्करोगाचे निदान निष्पन्न झाले. त्यानंतर गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया करण्यासाठी ५ तासांचा कालावधी लागला. आता रुग्ण बरा झाला असून पाचव्या दिवशी घरी सोडण्यात आले.

डॉ.कोले यांनी डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ.सचिन निलाखे व  पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ.वैभव माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यांना भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ.ज्योत्स्ना परांजपे व भूलतज्ज्ञ यांचे सहकार्य लाभले.

भारती हॉस्पिटलमध्ये तोंडाचे, जिभेचे, थायरॉईडचे तसेच स्वरयंत्राच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत केल्या जातात.