BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

अंकलखोप येथे १५०० जणांची दंत तपासणी | भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर संपन्न

अंकलखोप येथे १५०० जणांची दंत तपासणी
| भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाचे हिवाळी शिबीर संपन्न

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

अंकलखोप ता.पलूस येथे भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय यांच्यावतीने आठवडाभर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवत हिवाळी शिबीर संपन्न केले. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.समृद्धी मेथा यांनी पुढाकार घेतला. ७ दिवसांत १५०० जणांची दंत तपासणी करण्यात आली.डॉ. समृद्धी मेथा यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विष्णुप्रिया, गौरी, दीक्षा, समृद्धी यांनी शाळेतील किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबद्दल समजावून सांगितले.

अंकलखोप व औदुंबर येथील सर्व शाळांमध्ये मोफत दंत तपासणी करून टूथपेस्ट वाटप करण्यात आले. २५ टक्के सवलतीचे उपचार कार्ड देण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन ९०० गावकऱ्यांना मुख आरोग्याबद्दल माहिती देत प्रबोधन केले. हुतात्मा भगतसिंग हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय कराटे सुवर्ण विजेती  कु.शिवाणी संजय जाधव यांचे स्वसंरक्षण शिबीर घेण्यात आले.

उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय अंकलखोप येथे सामाजिक बांधिलकी या विषयावर पथनाट्य सादर केले व झाडांची रोपे देण्यात आली. यासाठी दंतचे प्राचार्य डॉ.शरद कामत, उपप्राचार्या डॉ. जीवनआशा अग्रवाल यांची मदत झाली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजेश्वरी सावंत होत्या. यावेळी उपसरपंच संगीता कोळी व सर्व सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.