BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये जागतिक कुष्ठरोग दिनभारती हॉस्पिटलमध्ये जागतिक कुष्ठरोग दिन 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली(रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील त्वचारोग विभागामध्ये भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, अधिष्ठाता डॉ.सारा धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली 
७१ वा 'जागतिक कुष्ठरोग दिन' पाळण्यात आला.

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये मागील ७-८ वर्षात त्वचारोग विभागाने ७० रुग्णांचे कुष्ठरोगी म्हणून निदान केले. त्यातील बरेचजण औषधोपचाराने ठीक झाले तर काही रुग्णांवर उपचार चालू आहेत. विशेष म्हणजे ५ लहान मुलांचे निदान होवून ते या कुष्ठरोगातून बरे झाले आहेत. त्यामुळे कुष्ठरोग पुर्णपणे बरा होवू शकतो असे मत येथील त्वचारोग विभागप्रमुख प्रा.डॉ.रेणूका अष्टेकर यांनी व्यक्त केले. 'कुष्ठरोगावर मात' (BEAT LEPROSY) ही यावर्षीची थीम आहे. यानिमित्ताने त्वचारोग विभागामार्फत कुष्ठरोगाविषयी कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी उपाधिष्ठाता डॉ. पंकज पलंगे, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा गायकवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे उपस्थित होत्या. त्वचारोग विभागातील प्रा. डॉ.चंद्रशेखर पुरंदरे यांनी कुष्ठरोग कसा व कशामुळे होतो याची माहिती दिली. व पांढरा चट्टा दिसल्यास नकळत हातांना व पायांना होणारी जखम आढळल्यास 
त्वरित चाचणी करून उपचार चालू करावेत. कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असे सांगितले. मायक्रोबायोलॉजीच्या प्रा. डॉ.रोहिणी सुर्यवंशी यांनी कुष्ठरोग निदानासाठी लागणाऱ्या चाचण्यांविषयी माहिती सांगितली. यावेळी कुष्ठरोगाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.

फिजिओथेरपी कॉलेजच्या प्रा. डॉ.शीतल स्वामी यांनी कुष्ठरोगांमुळे होणाऱ्या विकृतींवरील विविध फिजिओथेरपी उपचारांची माहिती दिली व हे उपचार भारती हॉस्पिटलच्या फिजिओथेरपी विभागात उपलब्ध असल्याचे सांगितले. या कार्यशाळेसाठी डॉ.अनुप फडके, डॉ.राजवर्धन बागणे यांच्यासह त्वचारोग विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

डॉ. शांतीप्रसाद तिप्पाणावर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास फिजिओथेरपी, नर्सिंग आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.