BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये सिकल सेल ऍनिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलेने दिला मुलास जन्म


भारती हॉस्पिटलमध्ये सिकल सेल ऍनिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलेने दिला मुलास जन्म  | बाळ व बाळंतीण सुखरूप


भारती हॉस्पिटल न्यूज, सांगली |  (रोहित रोकडे)

भारती हॉस्पिटलमध्ये सिकल सेल ऍनिमिया या आजाराने त्रस्त असणाऱ्या २१ वर्षीय महिलेने एका मुलास जन्म दिला असून बाळ व बाळंतीण सुखरूप आहे.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांचे सहकार्य लाभले.

अधिक माहिती देताना स्त्री रोग तज्ञ डॉ. शर्वरी जाधव यांनी सांगितले की, या महिलेला दर दोन महिन्यांनी रक्त चढवायला लागायचे हेमेटोलॉजिस्टने तिचे लग्न करू नका असा सल्ला दिला होता. परंतू तिचे लग्न झाले, ती गरोदर राहिली. गरोदरपणात ती चौथ्या महिन्यात भारती हॉस्पिटलला आली. तेव्हा तिला छातीत दुखणे, सांधेदुखी, धाप लागणे आणि रक्त कमी होणे असा त्रास होत होता. मेडिसिन, गायनॅक आणि हेमेटोलॉजिस्ट अशा सर्व डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. गरोदर राहिलीच आहे तर ही प्रेग्नंन्सी नियमित करून शक्य तितकं चांगलं बाळ देण्यासाठी प्रयत्न करूया असं ठरवून त्या महिलेला स्त्रीरोग विभागात नेण्यात आले. त्यानंतर दर दोन दिवसांनी ब्लड ट्रान्सफ्युजन आणि ऑक्सिजन सपोर्ट देऊन सोनोग्राफी करून गर्भातच बाळाची वाढ कशी होईल हे बघितले. एकेक महिना करत रुग्णाला चार महिने वॉर्डात राहावे लागले. ३६ आठवडे पूर्ण झाल्यावर बाळाची वाढ बघून तिचे सिझेरियन केले. 


काय आहे सिकेल सेल ऍनिमिया..

तांबड्या पेशींचा अतिशय दुर्मिळ असा आजार आहे. तांबड्या पेशी गोलाकार असतात पण या आजारात त्या चंद्राकृती असतात. त्यांचे आयुष्यमान ४० दिवसांचे असते. (नेहमीच्या तांबड्या पेशींचं आयुष्यमान १२० दिवस असते.) त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी होऊन रुग्ण सतत आजारी राहतो. वरचेवर त्याला रक्त चढवावे लागते. बाळंतपणात हा आजार जास्त बळावतो व रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. असा दुर्मिळ आजार असलेले रुग्ण भारती हॉस्पिटलमध्ये हाताळले जातात. 


या दुर्मिळ केसमध्ये डॉ.संजीवनी देशपांडे, डॉ.संगीता शहा, डॉ.पंकज पलंगे, डॉ.चिदानंद चिवटे, डॉ.संदीप नेमाणी, भूलतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना परांजपे, गणेश कुंभार, डॉ.आदित्य कुरडे, डॉ.राहुल काडगे व सर्व टीमने मोलाची कामगिरी बजावली.