BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये ३३ वर्षीय महिलेची आव्हानात्मक शस्त्रक्रिया


भारती हॉस्पिटलमध्ये ३३ वर्षीय महिलेची आव्हानात्मक शस्त्रक्रिया 

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

येथील भारती विद्यापीठ अँड मेडिकल कॉलेजमध्ये एका ३३ वर्षीय महिलेची आव्हानात्मक असणारी सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 

स्त्री रोग तज्ञ डॉ.विद्या जाधव यांनी अवघ्या एका तासात शस्त्रक्रिया केली. 

भूलतज्ज्ञ डॉ.अस्मिता कर्नाळकर यांनी सांगितले की, त्या महिलेचे वजन १३० किलो होते. याच कारणामुळे त्यांना भूल देणे कठीण होते, जोखमीचे होते. येथील भूलतज्ज्ञांनी ते आव्हान पेलले अन् शस्त्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये डॉ. गणेश कुंभार, डॉ.अस्मिता कर्नाळकर, डॉ.अनिल, डॉ.एमिल यांचे सहकार्य लाभले. 

डॉ.विद्या जाधव म्हणाल्या, येथे भूल देऊन अत्यंत कुशलतेने सिझेरियन प्रसुती करण्यात आली. यावेळी पेशंटचे १३० किलो वजन, तसेच रक्तदाब जास्त वाढलेला असल्याने भूल देणे व शस्त्रक्रिया करणे अवघड होते. भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या टीमने कसोशीने प्रयत्न करून १३० किलो वजनाच्या महिलेचे बाळंतपण (सिझेरियन) पार पडले. सध्या बाळ व बाळाची आई सुखरूप आहे. भारती हॉस्पिटलमध्ये  प्रसुती व सिझेरियन शस्त्रक्रिया औषधांसह मोफत होतात. गरोदरपणातील रक्तदाब वाढणे, हृदयविकार, वार खाली असणे, अकाली वार सुटणे यावर व्यवस्थित उपचार होतात. यापूर्वी ८०-९० किलोपर्यंत अशी शस्त्रक्रिया केली आहे. परंतू ही १३० किलो वजनाची पहिलीच महिला आहे.  

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ . सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी भारती हॉस्पिटलमध्ये सेवा सुविधा देण्यासाठी कायमच सज्ज आहेत. डॉ. एच.एम. कदम  म्हणाले, भारती हॉस्पिटलमध्ये सगळेच विभाग सर्व सोयीनियुक्त आहेत. येथे अत्याधुनिक मशीन असून सर्व उपचार एकाच छताखाली होतात. सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. 

शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ.फाल्गुनी मेहता, डॉ.श्रुती पाटील, डॉ.वैभव यांनी मोलाची कामगिरी बजावली.