भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये कोलकता घटनेचा निषेध
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
कोलकता येथील आर.जे. कर सरकारी रुग्णालयात झालेल्या डॉक्टर हत्याप्रकरणी येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. पिडीत डॉक्टरसाठी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने याचे आयोजन केले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी अशा प्रवृत्तींचा तीव्र निषेध व्यक्त करत श्रद्धांजली वाहण्यात आली. पिडितेला न्याय मिळावा तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना व्हाव्यात अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
यावेळी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डीन डॉ. सारा धनवडे, डेप्युटी डीन डॉ.आर.पी.लिमये, डॉ.नितीन मुदीराज यांच्यासह सर्व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एका ३१ वर्षाच्या निवासी डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली गेली. संपूर्ण देश या प्रकाराने हादरून गेला आहे. नागरिकांसह वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.